जवानाने 5 सहकार्‍यांवर झाडल्या गोळ्या

नारायणपूर (छत्तीसगड) – इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (खढइझ)एका जवानाने आज, बुधवारी सहकार्‍यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात 5 जवान ठार झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्याने स्वतःवरही गोळी झाड़ून आत्महत्या केली. छत्तीसगड येथील नारायणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. त्यांच्यात सुट्टीवरून वाद झाल्याचे समजते. नारायणपूर येथील पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांच्या माहितीनुसार, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील जवानांमध्ये सकाळी जोरदार वाद झाला. यातून झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. यात आणखी दोन जवान जखमी झाले आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा