जैन स्वाध्याय संघाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात

अहमदनगर – श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन स्वाध्याय संघ गुलाबपुराचे वार्षिक अधिवेशन मुंबई येथे कांदिवली रघुलीला हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाला. स्व.पूज्य पन्नालाल म.सा यांनी जैन समाजात 80 वर्षे पूर्वी या स्वाध्याय संघाची स्थापना केली होती. त्यांचे शिष्य पूज्य सोहनलाल म.सा. तद्नंतर आचार्य पूज्य सुदर्शनलाल म.सा यांच्या प्रेरणेने कार्यरत आहे. पूज्यवर यांचा चातुर्मास मुंबई, बोरिवली येथे आहे, त्यामुळे हा कार्यक्रम मुंबई येथे ठेवण्यात आला होता. जैन समाजातला सर्वात पहिला स्वाध्याय संघ पूज्यवरनी स्थापन केला होता आणि आजही तो निरंतर मोठ्या प्रमाणावर चालू आहे, या स्वाध्याय संघांमध्ये जवळपास 600 स्वाध्याय आहे.

जैन धर्मात पर्युषण पर्व हे सर्वात मोठे सण आहे आणि या पर्युषण पर्वामध्ये प्रत्येक ठिकाणी साधूसंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे जिथे साधू-संत चातुर्मासाला नसतात. त्या ठिकाणाहून या स्वाध्याय संघाच्या सदस्याला धार्मिक आराधना करून घेण्यासाठी आमंत्रित केले जाते. हे सदस्य जवळ जवळ दहा दिवस तेथे वास्तव्य करून जैन धर्मातील शास्त्राचे वाचन करून जैन धर्माचे महत्त्व समजावून देतात. या अधिवेशनामध्ये अहमदनगर येथून अशोक बाबूशेठ बोरा यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी स्वाध्याय संघाचे मंत्री पारसमल दोशी यांनी बाबूशेठ बोरांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला आणि याप्रसंगी बाबूशेठ बोरा यांनी या स्वाध्याय संघाचे महत्त्व पटवून दिले तसेच आता अनेक ठिकाणी स्वाध्याय संघाची स्थापना झालेली आहे. त्याचप्रमाणे नगर येथे श्री आचार्य आनंदऋषीजी म. सा च्या प्रेरणेने स्वाध्याय संघ उत्कृष्ट कार्यरत आहे.

या समारंभासाठी संपूर्ण देशातून जवळजवळ पाचशे स्वाध्यायी व भक्तगण उपस्थित होते.

या समारोहाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमान अरुण भाटिया, मदुराई तुतिकोरीन नांदेडहून ओमप्रकाश पोखरणा, सांगलीहून सुभाष मुथा, समाजसेविका डॉ.अर्चना जयपुर, ज्ञानचंदजी मदुराई, प्रमोद अजमेर, अहमदनगरहून शांतीलाल गुंदेचा व स्वप्नील मुथा उपस्थित होते. शेवटी स्वाध्याय संघाचे मंत्री पारसमल दोशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा