जगन्नाथपुरी

जगन्नाथपुरी हे स्थळ चार धामांपैकी एक धाम आहे हे भारताच्या पूर्व किनार्य्वर वसलेले आहे ह्या स्थळाला  अतिशय रुंद,स्वच्छ आणि लांब समुद्र किनारा लाभला आहे . जगन्नाथाचे  मंदिर हे गावाच्या अगदी मध्यभागी  असून  ते निलगिरी  टेकडीवर  उभारले आहे .ह्या मंदिराला  चार दार आहेत तसेच त्यांना वेगवेगळ्या नावाने उद्गारले जाते  जसे पूर्वेच्या दाराला सिंहद्वार,रुपकुट दक्षिणेकडच्या दाराला अश्वदार,उत्तरेकडच्या दाराला हत्तीद्वार ,पश्चिमेकडच्या दाराला व्याघ्रद्वार असे म्हणतात.हे मंदीर ओरिसातील सर्वात उंच मंदिर आहे .ह्या आवारात चार विभाग केले गेले आहेत  त्यात एक म्हणजे भोग मंदिर इथे देवाच्या नैवेद्यासाठी निरनिराळे ६४ पदार्थ बनले जातात व त्याचा नैवेद्य  हा दाखवला जातो नंतर तो नैवेद्य येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

दुसरा विभाग म्हणजे हे नर मंदिर ह्या मंदिरात देवाचे भजन ,कीर्तन,नृत्य असे कार्यक्रम आयोजित केले जगन्नाथपुरी तिसरा विभाग म्हणजे देवांचे दर्शन घेण्याचे ठिकाण .तिसऱ्या विभागाला जोडूनच चौथा विभाग आहे जे देवांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत . ह्या मंदिरातल्या मूर्ती वेगळ्याच रुपात आहे. बलराम,सुभद्रा, व जगन्नाथ ह्या तिघांच्या मूर्ती असून त्यांना हात -पाय नाहीत .त्यापैकी बलरामाची मूर्तीची उंची  ४ फुट, सुभद्रेच्या मूर्तीची उंची ४ फुट, जगन्नाथ देवाची उंची ५ फुट आहे तसेच ह्या मूर्ती ५ फुट उंचीवर असलेल्या माणिक रत्नांची  सजवलेल्या सिंहासनावर बसविलेल्या आहे . ह्या मूर्ती आगळ्या-वेगळ्या  आहेत म्हणजेच त्यांचे डोळे खूपच मोठे  आहे व हसणाऱ्या ओठांची रचनाही अतिशय लांब आहे.

जगन्नाथपुरी ह्या शहराच्या टोकाजवळ लोकनाथ हे शंकराचे मंदिर आहे तसेच  तेथील आनंद बाजार  हे जगातील सर्वात मोठे खाद्यपदार्थांचे  मार्केट आहे .येथे निरनिराळ्या हस्तकलेच्या वस्तू मिळतात .

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा