आयटी पार्कसाठी मुलाखतीतून निवड झालेल्यांना दिली नियुक्तीपत्र

19 ऑगस्टपासून दिले जाणार प्रशिक्षण; महिना अखेरीस नगरमधील आयटी पार्कचे उद्घाटन

अहमदनगर- नगरच्या एमआयडीसीमध्ये सुरु होत असलेल्या आयटीपार्कमध्ये नोकर भरतीसाठी दोन कंपन्यांकडून युवक- युवतींच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर त्यातून निवड झालेल्यांना मंगळवारी (दि.13) दुपारी आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते नोकरीसाठीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

या सर्व निवडलेल्या उमेदवारांना दि. 19 ऑगस्ट पासून प्रशिक्षण दिले जाणार असून महिना अखेरीस आयटी पार्कचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती आ. जगताप यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 250 ते 300 युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे तर डिसेंबरपर्यंत सुमारे 1000 पेक्षा जास्त युवक-युवती आयटी पार्कमध्ये कार्यरत होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी दि.2 ते 4 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आल्या. त्यावेळी सुमारे 3 हजार युवक-युवतींनी उपस्थिती दर्शविली होती. पहिल्या टप्प्यासाठी ज्यांची निवड होऊ शकली नाही त्यांनी निराश न होता. पुढील टप्प्यात अधिक तयारी करून मुलाखत द्यावी असे आवाहन आ. जगताप यांनी केले.

नगर एमआयडीसीत गेल्या 19 वर्षांपासून धुळखात पडलेल्या आयटीपार्क इमारतीचे आ.संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन रुप पालटले आहे. याठिकाणी सात ते आठ आयटी कंपन्या लवकरच कार्यरत होणार आहेत. त्यातील दोन कंपन्यांनी नोकर भरतीसाठी मुलाखती घेवून निवड झालेल्या युवक-युवतींना विविध पदांवर नियुक्त्या दिल्या आहेत. यामध्ये 12 वी पासून ते पदवीधरपर्यंत तसेच पदव्युत्तर पदवी धारकांचा समावेश आहे.

आयटी पार्कचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार

आ.संग्राम जगताप म्हणाले गेल्या 5 वर्षात शहरात विकासकामे करण्याबरोबरच तरुणांना शिक्षणानंतर रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले गेले. शहरात आयटी पार्क सुरु होण्यासाठी सातत्याने विविध कंपन्यांशी संपर्क सुरु होता, त्यास आता यश आले आहे. पहिल्या टप्प्यात 250 ते 300 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून डिसेंबरपर्यंत ही संख्या 1000 वर जाईल आणि येत्या 5 वर्षात नगर शहर इतर महानगरांप्रमाणे आयटी हब म्हणून ओळखले जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आय टी पार्कचे स्वप्न महिना अखेरीस प्रत्यक्षात साकार होईल. शहरातील युवकांना आता रोजगारासाठी घरदार सोडून इतर शहरात जाण्याची गरज भासणार नाही. युवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा