क्रेडीट रिपोर्टमधील चुका कशा सुधराव्यात?

तांत्रिक माहिती असणे गरजेचे : आपल्या क्रेडिट स्कोरवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच क्रेडिट रिपोर्टच्या नियमित तपासणी करत राहा. कारण याच रिपोर्टवर आपले क्रेडिट रेटिंग अवलंबून असते. एखाद्या कंपनीकडून कर्ज घ्यायचे असेल तर संबंधित कंपनी क्रेडिट ब्यूरोला आपल्याविषयी माहिती देते. ही माहिती जमा करण्यासाठी सर्वसाधारणपणे दीड महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे काही वेळेला बंद केलेले कर्ज खाते आपल्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तात्काळ दिसत नाही. कर्ज देणार्‍या कंपनीने कर्ज खाते बंद केल्याची माहिती क्रेडिट ब्यूरोला दिली नसेल किंवा कर्ज देणार्‍या बँकेने कर्जदाराविषयी माहिती देताना काही त्रुटी ठेवल्या असतील तर आपल्या क्रेडिट स्कोरमध्ये घसरण होऊ शकते. या आधारे आपल्याला गृहकर्ज किंवा मोटार कर्ज देण्यास बँका तयार होणार नाहीत. परिणामी गरजेच्या वेळी आपण कर्जापासून वंचित राहू शकतो. म्हणून आपण स्वत: कोणत्याही क्रेडिट इन्फॉरमेशन ब्यूरो सजे की क्रेडिट इन्फॉरमेशन ब्यूरो ऑफ इंडिया लिमिटेड (सिबिल) आणि एक्सपेरियनकडून क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता.

चुकीचे विवरण : आपला क्रेडिट रिपोर्टच्या ज्या विभागात आपली व्यक्तिगत माहिती दिलेली असते, त्याची एकदा खातरजमा करून घ्या. जसे की आपल्या नावाचे स्पेलिंग, जन्मतारिख, पत्ता अचूक आहे की नाही हे तपासा. याशिवाय पॅन कार्डचे विवरण, क्रेडिटविषयी संपूर्ण माहिती आपल्या खात्याशी जोडलेली असते.त्यामुळे त्याचा उल्लेख योग्यरितीने आहे की नाही, ते पाहा, अन्यथा अन्य व्यक्तीच्या क्रेडिटसंबंधी माहिती आपल्या अहवालात येऊ शकते.

खात्याचे चुकीचे विवरण : आपल्या अहवालात सर्व क्रेडिट खाते आपल्या हकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना क्रेडिट स्कोरची विचारणा केली जाते. कारण यामध्ये दोन गोष्टींची माहिती मिळते. ती म्हणजे आपल्याला कोणत्या अटीवर किती क्रेडिट दिले गेले हे समजणे सोपे जाते. क्रेडिट नंबर हा तीन अंकांचा एक नंबर आहे, जो की आपला क्रेडिबिलिटीचे प्रतिनिधित्व करतो. हा स्कोर साधारणपणे 300 ते 900 अंकादरम्यान असतो. नावाचे आहेत की नाही ते पाहा. त्यात एखादी एक्स्ट्रा एंट्री नाही ना याची खातरजमा करावी.

लेट पेमेंटचा चुकीने उल्लेख : अमाऊंट ओव्हरड्यू, लेट हप्ता किंंवा क्रेडिट कार्डचे पेमेंट हे आपल्या क्रेडिट स्कोरचे प्रतिनिधीत्व करते. आपण वेळेवर रक्कम भरत असतानाही लेट पेमेंटचा उल्लेख येत असेल तर त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. कारण थकीत पेमेंटमुळे आपल्या क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

चुकीचे क्रेडिट लिमिट किंवा बॅलेन्स : चुकीच्या पद्धतीने क्रेडिट लिमिटच्या उल्लेखामुळे तसेच अधिक क्रेडिटचा उपयोग केल्याने देखील स्कोर देखील कमी होतो. त्यामुळे क्रेडिट स्कोरमध्ये चुकीची माहिती किंवा विवरण तर नाही ना, याबाबत खातेदाराने सजग राहणे आवश्यक आहे. सध्याच्या क्रेडिट बॅलेन्सची देखील तपासणी करावी.