आयडीए अॅवॉर्डस् 2019 च्या प्रवेश पत्रिकेचे उद्घाटन

अहमदनगर- इंटेरियर डिझायनर असोसिएशन अहमदनगर अर्थात आय.डी.ए.ए हि एक जिल्हा स्तरावरील संस्था आहे, या संस्थेचे 130 हुन अधिक सदस्य आहेत, इंटेरियर डिझायनर आणि ट्रेड मेम्बरचा फायदा व्हावा आणि सध्याच्या इंटेरियर डिझायनरला अधिक माहिती होण्यासाठी विविध सेमिनार व विविध स्पर्धाच आयोजन ही संस्था करीत असते.

नगरमधील इंटेरिअर डीझायनरच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी बेस्ट इंटेरियर डिझायनर ही स्पर्धा आयोजित केली असून यावर्षी इंटेरियर डिझायनर असोसिएशन व एलिमेंट स्टुडीओ प्रायोजित आयडीए अॅवॉर्डस् 2019 च्या प्रवेश पत्रिकेचे उद्घाटन समारंभ हॉटेल गुलमोहर प्राईड येथे झाला.

या कार्यक्रमासाठी प्रायोजक तसेच सह प्रायोजक इंडिया फर्निचर व तसेच बाळासाहेब हिंगे, जमाल सिद्दिकी, आनंद लोढा, अजहर खातीब व रेडीओ सिटी, जीवन न्यूज, हॉटेल गुलमोहर प्राईड व विठ्ठल कुसलकर यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाकरिता आय डी ए ए चे अध्यक्ष रोहीत लोटके, सचिव सागर कंदूर, संयोजक अरुण गावडे, पदाधिकारी अंकुर सुपेकर, सागर शहा, कविता पहुजा, विशाल दगडे, महेश बालटे, सौरभ गुगळे, व्रजेश शहा, वैभव गांधी, अवतारसिंग हिरा, अमोल खोले, अजय अपूर्वा, सुरज नन्नवरे, सचिन हिवाळे आदी उपस्थित होते.