पर्याय एचयुएफचा

एचयुएफ कसा होतो?

एचयुएफ नावाने बँकेत खाते सुरू करावे लागते. हे खाते कुटुंबप्रमुखांच्या नावाने असते. मात्र त्यानंतर एचयुएफ असा शब्द जोडावा लागतो. त्यानंतर पॅनकार्डसाठी अर्ज करावा लागतो. बँक खाते आणि पॅनकार्डची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एचयीएफच्या भांडवलाची बाब समोर येते.

नियम आणि अटी

एचयुएफची निर्मिती केवळ विवाहित मंडळीच करू शकतात. जर आपण अविवाहित असाल तर एचयुएफ करू शकणार नाहीत. एचयुएफतंर्गत प्राप्तीकरात सवलत मिळवण्यासाठी आपल्या घरात मुलं असणे गरजेचे आहे. जर कोणत्याही पतीपत्नीजवळ अपत्य नसेल तर आगामी काळात येणार्‍या मुलाचा उल्लेखही एचयुएफमध्ये करू शकता. हिंदू कायद्यानुसार हिंदू, शिख, बौद्ध आणि जैन हे एचयुएफ कायद्यात येतात. मोठे संयुक्त एकत्र कुटुंब या कक्षेत येते. अर्थात एचयुएफचे सदस्य एचयुएफला गिफ्ट देऊन कर सवलत देऊ शकत नाही, कर मिळवता येतो.

असा लाभ मिळेल

एचयुएफवर 80 सी अतंर्गत वैक्तिगत दीड लाखांपर्यंत करसवलत मिळवता येते. जर आपण एचयुएफतंर्गत येत असाल तर आपल्या उत्पन्नाची विभागणी करून आपण प्राप्तीकरात सवलत मिळवू शकतो. एक मुलगा आपले वडिल एचयुएफमध्ये असतानाही वेगळे एचयुएफ निर्माण करू शकतो. मुलगा आपली पत्नी, मुलगा यांना सामील करून एचयुएफची र्निर्मिती करू शकतो.

करसवलतीत दोन लाभ

एचयुएफ तयार केल्यानंतर आपण प्राप्तीकरावर दोनदा लाभ घेऊ शकतो. पहिले म्हणजे व्यक्तिगत आणि दुसरे म्हणजे एचयुएफ सदस्य म्हणून. अन्य स्त्रोत जसे की शेती, भाडे आदींतून मिळणार्‍या उत्पन्नाला एचयुएफमध्ये दाखविले तर त्यात सवलत मिळते.