राशिभविष्य

पुत्रदा एकादशी

1941 विकारी नामसंवत्सर

श्रावण शुक्लपक्ष

मूळ समाप्ती 24.45

सूर्योदय 06 वा. 1 मि.

सूर्यास्त 6 वा. 30 मि.

मेष – आज आपणास कठोर श्रम करावे लागतील. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. मागील उधारी वसुल होईल. जनसंपर्कातून प्रसिद्धीच्या झोतात राहाल.

वृषभ – आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील.

मिथुन – व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका.

कर्क – एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा.

सिंह – चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल.

कन्या – काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे.

तूळ – हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कार्यरत राहिल्याने मागील केलेले संकल्प पुर्णत्वास येतील.

वृश्चिक – शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. वाहने सावकाश चालवावीत व सांभाळावीत चोरी होण्याची शक्यता आहे.

धनु – वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल.

मकर – आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल.

कुंभ – भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न वातावरण राहील.

मीन – वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा