राशिभविष्य

1941 विकारीनाम संवत्सर

आषाढ शुक्लपक्ष

चित्रा समाप्ति 16 वा. 22 मि.

सूर्योदय 06 वा. 07 मि.

सूर्यास्त 07 वा. 18 मि.

मेष – प्रवासात दगदग, पती पत्नीतील मतभेदांना थारा देवू नका. आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल.

वृषभ – आर्थिक लाभ, सर्व कार्यात यश, जागा खरेदीसाठी चांगला दिवस. आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल.

मिथुन – संततीविषयक समस्या, खर्चात वाढ, व्यापारात मंदी जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या.

कर्क – स्थावर इस्टेटी संदर्भात अडचणी, राजकारण्यांना अती ताण. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल.

सिंह – सर्व प्रकारचे लाभ, प्रवासात यश, व्यावसायिक प्रगती. एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा.

कन्या – वैवाहिक जोडीदाराच्या चुकीमुळे आर्थिक तणाव वाढेल. चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ – आप्तजनांशी वितुष्ट, शारीरिक आळस वाढेल. पितृचिंता सतावेल. काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे.

वृश्चिक – योग्य विचारसरणीमुळे व्यक्तींना नमवाल. हितशत्रुंपासून धोका संभवतो. हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.

धनु – सर्व क्षेत्रात प्रगतीची घोडदौड, धनलाभ, वास्तुचे योग. शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा.

मकर – आर्थिक उत्पन्न वाढेल, कमाईचे नवे साधन उपलब्ध होईल. वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्यवेळी होतील. मुलांची शैक्षणिक काळजी वाटण्याची शक्यता.

कुंभ – करणीबाधा व शत्रुपीडेमुळे मानसिक त्रास होईल. भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल.

मीन – कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, वाईट संगत व व्यसनापासून दूर राहा. व्यावसायिक वृद्धीसाठी चांगला काळ. वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा