राशिभविष्य

दुर्गाष्टमी 1941 विकारीनाम

संवत्सर आषाढ शुक्लपक्ष

हस्त समाप्ति 17 वा. 15 मि.

सूर्योदय 06 वा. 09 मि.

सूर्यास्त 07 वा. 19 मि.

मेष – आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल.

वृषभ – आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. भावनांवर आवर घालावा लागेल.

मिथुन – आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. उत्तम विवाहसौख्य मिळेल.

कर्क – एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा.

सिंह – चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. कोणत्याही विषयाची आसक्ती नको. भातृ व मातृचिंता सतावण्याची शक्यता.

कन्या – काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे.

तूळ – हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. हितशत्रूंपासून सावधान राहावे. त्रास संभवतो. छोट्या-मोठ्या कारणांवरुन रागावू नका.

वृश्चिक – शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. प्रॉपर्टीचे व्यवहार करू नये.

धनु – वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्यवेळी होतील. दूरचे मित्र-मैत्रिणी अनपेक्षीतपणे भेटतील.

मकर – आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. नवीन वास्तू घेण्यासाठी चांगला दिवस.

कुंभ – आपला स्वभाव भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार आज करू नयेत. बाकी दिवस ठीक जाईल.

मीन – वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कार्यालयामध्ये सहका-यांकडून मदत मिळेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा