राशिभविष्य

1941 विकारी नामसंवत्सर

पौष शुक्लपक्ष

पुष्य 11।50

सूर्योदय 06 वा. 55 मि.

सूर्यास्त 06 वा. 54 मि.

मेष – मैदानी खेळात सहभागी व्हाल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. अचानक जुने मित्र भेटतील. कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा मित्रांबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल.

वृषभ – स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.

मिथुन – जोडीदाराला समजावून घ्याल. तुमचे व्यक्तिमत्त्व आज बहरेल. सहनशीलतेने कार्यरत राहाल.

कर्क – मानसिक ताण शक्य. कठोर बोलणे वा सहकार्‍यांशी गैरवर्तणूक महागात पडेल.

सिंह – प्रिय व्यक्तीविषयी शंका घेऊ नका. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील.

कन्या – आर्थिक गुंतवणुकीतून योग्य तो मोबदला मिळेल. नात्यामध्ये कटुता टाळा. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक कराल.

तूळ – वाहने व उपकरणे जपून वापरावीत. जोडीदाराबरोबर रोमँटिक क्षण अनुभवाल. वैवाहिक आयुष्य बहरेल.

वृश्चिक – कार्यालयाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा. सहकार्‍यांशी आपुलकीने वागा. अति खाणे टाळा.

धनु – शारीरिक व्यायाम अथवा योगाचे महत्त्व लक्षात घ्या. घरातील ज्येष्ठांशी प्रेमाने बोला. अति प्रमाणात प्रवास करावा लागेल.

मकर – आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक ऊर्जेने कार्यरत राहाल. आर्थिक स्थितीमध्ये बदल घडतील.

कुंभ – अनावश्यक गोष्टींचा विचार करू नका. मानसिक बळ वाढेल. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. उत्तरार्धात आर्थिक आवक वाढेल.

मीन – कर्जाऊ रक्कम देणे टाळावे. व्यवसायात भागीदारी तूर्तास नको. वैवाहिक आयुष्यात थोडे निवांत क्षण अनुभवाल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा