राशिभविष्य

विनायक चतुर्थी

1941 विकारी नामसंवत्सर

मार्गशिर्ष शुक्लपक्ष

पू.षा.08।15

सूर्योदय 06 वा. 57 मि.

सूर्यास्त 06 वा. 56 मि.

मेष – आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृषभ – प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंद आणि उल्हास आणू शकते.

मिथुन – आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील पळापळ देखील अधिक राहील.

कर्क – आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक आणि अर्थपूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. पैसा खर्च होईल.

सिंह – आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल.

कन्या – आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या आणि मनन-चिंतन करा. काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा.

तूळ – सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली करा.

वृश्चिक – आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाणघेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा.

धनु – आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा.

मकर – आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकार्‍यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल.

कुंभ – आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्य वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.

मीन – आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अधिक श्रम करावे लागतील. एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा