राशिभविष्य

1941 विकारी नामसंवत्सर

कार्तिक शुक्लपक्ष

शततारा अहोरात्र

सूर्योदय 06 वा. 47 मि.

सूर्यास्त 06 वा. 54 मि.

मेष – अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकार्‍यांपासून लाभ मिळेल. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

वृषभ – महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.

मिथुन – राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. काम व इच्छित योजनेला अमलात आणावे.

कर्क – कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा.

सिंह – नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील.

कन्या – आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील.

तूळ – व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आरोग्य नरम-गरम राहील. व्यापारव्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल.

वृश्चिक – वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपले काम धाडसाने करा. काही नवीन संधी मिळतील.

धनु – आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. लांबचे प्रवास टाळा.

मकर – आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

कुंभ – आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. घरातील वातावरण आनंददायी राहील.

मीन – गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा