राशिभविष्य

क्षीरदान-द्विदलव्रत

1941 विकारी नामसंवत्सर

आश्‍विन शुक्लपक्ष

शततारा 26.14

सूर्योदय 06 वा. 32 मि.

सूर्यास्त 06 वा. 31 मि.

मेष – महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. पैशासंबंधी येणार्‍या सर्व अडचणी दूर होतील.

वृषभ – निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. आरोग्य चांगले राहील.

मिथुन – प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या.

कर्क – प्रसिद्धी वाढण्याची शक्यता आहे. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. मागील उधारी वसुल होईल.

सिंह – कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील.

कन्या – आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा.

तूळ – अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक – कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

धनु – वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारव्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल.

मकर – मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल.

कुंभ – इतर लोकांना आपल्या स्वतः ची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल.

मीन – हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा