राशिभविष्य

प्रदोष 1941 विकारी नामसंवत्सर

भाद्रपद शुक्लपक्ष

श्रवण 13.59

सूर्योदय 06 वा. 5 मि.

सूर्यास्त 06 वा. 27 मि.

मेष – आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. मागील जी कामे बाकी आहेत ती पूर्ण करण्यात यश मिळेल.

वृषभ – आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. वाहने व यांत्रिक उपकरणे जपून चालवावीत. कुटुंबियांचा चांगला सहवास लाभेल.

मिथुन – आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. पत्नीकडून उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल.

कर्क – आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

सिंह – योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कन्या – मनोरंजनावर खर्च होईल. शेजारी व कार्यालयीन सहका-यांबरोबर तंटा करू नका. प्रेमसंबंधात यश मिळेल.

तूळ – काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आज आपणास कामाचा शिण येवू शकतो. हितशत्रुंपासून सावधन असावे.

वृश्चिक – संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या उतावीळ स्वभावावर संयम ठेवून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल.

धनु – आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. मात्र अडचणी आपला पिच्छा सोडत नाहीत.

मकर – थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. जुन्या मित्रांचा सहवास आनंददायी ठरेल.

कुंभ – आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल.

मीन – पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. मनोरंजनाकडे कल राहिल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा