राशिभविष्य

तिथिवासर

1941 विकारी नामसंवत्सर

भाद्रपद शुक्लपक्ष

उ.षा.11.9

सूर्योदय 06 वा. 5 मि.

सूर्यास्त 06 वा. 27 मि.

मेष – चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर बराच वेळ व्यतीत कराल.

वृषभ – काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. वाहने व यांत्रिक उपकरणे सावधगिरीने हाताळावीत.

मिथुन – हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. आपल्या उतावीळ स्वभावाला आज नियंत्रीत करावे.

कर्क – शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. पत्नीकडून उत्तम वैवाहिक सुख प्राप्ती होईल.

सिंह – वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मुले व पत्नीचा सहवास लाभेल. दिवस चांगला जाईल.

कन्या – कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. दिवस आनंदात जाईल. आपला चंचल स्वभाव मात्र स्थिर ठेवावा.

तूळ – भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. पैसे देण्याच्या बाबतीत जपून वागावे लागेल.

वृश्चिक – वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. आज कुणालाही आर्थिक मदत करू नका.

धनु – भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. पैसे बुडण्याची शक्यता अथवा फसवणूक होऊ शकेल.

मकर – सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाची कामे आज करू नयेत. सार्वजनिक ठिकाणी मानसन्मान मिळेल.

कुंभ – प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील.

मीन – कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. जुनी मित्र-मैत्रिणी भेटतील. आपला प्रामाणिक स्वभाव असल्यामुळे कामे पूर्ण होतील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा