अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये ग्राऊट, हाडांचे, मणक्यांचे विकार, संधीवात, अॅलर्जी व दमा विकारावर 19 ऑगस्टपासून तपासणी व उपचार शिबीर

अहमदनगर- अहमदनगर होमिओपॅथिक शिक्षण संस्थेचे अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल सावेडी रोड येथे सोमवार दि. 19 ऑगस्ट ते शनिवार दि. 24 सप्टेंबरपर्यंत सकाळी 9.00 ते 5.30 या वेळेत ग्राऊट, हाडांचे मणक्यांचे आजार, संधीवात, अॅलर्जी, दमा या विकारांवर मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य व रुग्णालयीन अधीक्षक डॉ. सुनील पवार यांनी दिली.

सदर शिबिरामध्ये ग्राऊट, हाडांचे मणक्यांचे आजार, संधीवात, अॅलर्जी, दमा यावर सखोल चिकित्सा करून आजार बरा होईपर्यंत दर आठ दिवसाला मोफत औषधे दिली जातील.

शिबिरांतर्गत सर्व रुग्णांची मोफत तपासणी प्राचार्य डॉ. सुनील पवार, डॉ. मोरे माधुरी, डॉ. संकेत लांडे हे करणार असून आजार बरा होईपर्यंत सर्वांना मोफत औषधे देण्यात येतील. तसेच गरजेनुसार ईसीजी, रक्त, लघवी व सोनोग्राफी व एक्स-रे ची तपासणी करून, या तपासण्यांवर 30 टक्के सवलत दिली जाईल.

तरी परिसरातील सर्व गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले, उपाध्यक्ष भूषण चंगेडे, खजिनदार डॉ. विलास बी. सोनवणे, सचिव डॉ. डी. एस. पवार, सरसचिव लक्ष्मीनिवास सारडा, संचालक बोरा आर. एस., अभय मुथ्था, मदन क्षत्रिय, शिवाजी रणसिंग, डॉ. समीर होळकर, राजेंद्र मेहेत्रे, डॉ. ऋतुजा चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार व आरएमओ डॉ. मोरे माधुरी यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा