सबके लिए घर मोहिम भिंगार परिसरात राबवावी -उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद यांची मागणी

नगर- पंतप्रधान शहरी आवास योजना अंतर्गत सबके लिए घर स्लम पुर्नविकास ही मोहिम भिंगार येथील छावणी परिसरातही राबवण्यात यावी अशी मागणी भिंगार कॅन्टोनमेंटचे सीईओ विद्याधर पवार यांच्याकडे कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद अब्दुल रहिम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

यावेळी शहवाज सय्यद, सोफियान सय्यद, अजीम सय्यद, सोनु बकरे, आकाश मोरे, सलमान सय्यद, वसिम शेख, आकाश शिंदे, आदेश सोनवणे, योगेश बोराडे, अकिब शेख, सिध्दांत पाटोळे, पुजा गायकवाड, माधुरी कांबळे, ठकुबाई घाविसावे, भारत ठेाकळ, जितेंद्र शेरकर, गणेश साळवे, सुरज कुरणे, निखिल कांबळे, रितिक परदेशी आदी उपस्थित होते.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्यावतीने सबके लिए घरकुल योजना भारत भर राबविण्यात येत आहे.. देशभरातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका हद्दीत सदरची योजना राबवली जात आहे. तसेच नगर येथील मनपात देखील ही योजना यशस्वी राबवण्यात आली आहे.

शहरातील दुर्बक घटकांना त्याचा लाभ झालेला आहे. त्याच धर्तीवर आता छावणी परिसरातील दुर्बल घटकांमध्ये ही पंतप्रधान शहरी आवास योजना राबवावी, यापासून कोणीही वंचित राहू नये , छावणी परिसरात अनेक गोर गरीब, कष्टकरी समाज वास्तव्यास आहे. सदर योजना येथील गरजुना मिळावी ही अपेक्षा आहे. यावर आपण विशेष लक्ष देऊन ही योजना सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची मागणी असल्याचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद अब्दुल रहीम यांनी म्हटले आहे.