गृहकर्ज विम्यासाठी टर्म प्लॅनच फायदेशीर

गृहकर्जावरील विमा कवच महागडे

जेव्हा आपण गृहकर्ज घेतो, तेव्हा त्या संपूर्ण रक्कमेवर विमा कवच उतरवला जातो. साधारणपणे या विम्याचा हप्ता हा एकदाच भरावा लागतो. आपण 25 लाख होम लोनचा विमा उतरवत असाल तर विमा हप्त्याची रक्कमही होम लोनला जोडली जाते. यातून हप्त्यात वाढ होते. त्याचवेळी केवळ होम लोनला विमा कवच असल्याने कर्जाची रक्कम कमी होण्याबरोबरच विमा कवचही कमी होत जाते. यातून दुहेरी नुकसान होते. जर आपण वेळेच्या अगोदरच गृहकर्ज फेडले तर बहुतांश बँका विम्यापोटी दिलेली रक्कम परत देत नाहीत.

टर्म इन्शूरन्स

टर्म प्लान हा जीवन विमा श्रेणीत येतो. टर्म प्लान हा सर्वाधिक स्वस्त मानला जातो. यात जीवन विम्याच्या अन्य पॉलिसीप्रमाणेच परिपक्वतेवर कोणत्याही प्रकारची रक्कम मिळत नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा बोनसही मिळत नाही. असे असतानाही टर्म इन्शूरन्स हा फायदेशीर आहे. कारण विमाधारकासमवेत एखादी दुर्देवी घटना घडली किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास विमा कवचची संपूर्ण रक्कम हातात पडते. याप्रमाणे 50 लाख रुपयाच्या टर्म प्लॅनसाठी साधारणपणे सहा हजार हप्ता बसतो.

कमी हप्त्यात अधिक लाभ

आजघडीला विमा कंपन्या सुमारे पाच हजाराच्या वार्षिक हप्त्यात 50 लाख रुपर्यांपर्यंतचे विमा कवच बहाल करते. त्याचवेळी आठ हजार रुपयात एक कोटीपर्यंत कवच देत आहेत. पॉलिसीधारक हयात नसताना ही रक्कम त्याच्या कुटुंबीयांसाठी अतिशय मोलाची ठरते. म्हणूनच टर्म प्लॅन हा चांगला पर्याय मानला जातो.

विमा कवच कमी होत नाही

टर्म प्लॅनमध्ये विमा कवच हा पॉलिसीच्या कालावधीनुसार कमी होत नाही. आपण जर 50 लाखांचा टर्म प्लॅन घेतला असेल तर कर्जफेडीपर्यंत त्यात बदल करू शकत नाही आणि कवचही तेवढेच राहते. त्याचवेळी होमलोनमध्ये जसजसे होम लोन कमी होत जाते, तसतसे कवचमध्येही घट होत राहते. आपण होम लोन अन्य बँकेत ट्रान्सफर करू इच्छित असाल तर त्याचवेळी लोनचे विमा कवच संपुष्टात येते. तसेच आपल्याला दुसर्‍यांदा विमा कवच घ्यावे लागते. त्याचवेळी टर्म प्लॅनमध्ये होमलोन ट्रान्सफर केला तरी विम्यावर कोणताही परिणाम होत नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा