बस कंडक्टरला मारहाण

अहमदनगर- एस.टी. बसमधून प्रवासी उतरून घेणार्‍या चौघांना अटकाव केल्याच्या कारणावरून चौघांनी बस कंडक्टरला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.17) दुपारी 6.45 वा. स्वतिक चौकातील पुणे बसस्थानकावर (3 नंबर स्टॅण्डवर) घडली. विजय बबन चव्हाण (रा. मंगलमुर्ती नगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. पाथर्डी) हे एस.टी. (क्र. एम एच 14, बी.टी. 3171) जवळ उभे असताना तीन ते चार अनोळखी इसमांनी एस.टी. बसमधून प्रवासी उतरून घेण्यास सुरूवात केली असता चव्हाण यांनी बसमधून प्रवासी उतरवू नका, असे म्हटले याचा राग येऊन चौघांनी चव्हाण यास शिवीगाळ करून मारहाण केली. तिकीट देण्याचे मशिन फोडून सरकारी कामात अडथळा आणला.

याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भादंविक 353, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा