वाहन चालकांच्या भांडणात मध्यस्थी करणार्‍यास मारहाण

अहमदनगर- किरकोळ अपघातानंतर दोन वाहन चालकांकडून होत असलेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून तिघांनी शिवीगाळ दमदाटी करत लाथा-बुक्क्यांनी व विटांनी मारहाण केल्याची घटना नगर-पुणे रोडवरील कोठी येथे शुक्रवारी (दि.14) सकाळी 11.15 वाजता घडली.

याबाबतची हकीकत अशी की, शाम मुरलीधर कांबळे (वय 30, रा.इंदिरानगर, केडगाव) हा त्याची मोटारसायकल क्रमांक एम.एच.16, बी.एन.6556 वरुन केडगावहून पराग बिल्डींगकडे जात असताना कोठी चौकात दोन वाहनांचा किरकोळ अपघात झालेल्या ठिकाणी ते थांबले. दोन्ही वाहनचालक आपआपसात भांडत असताना कांबळे याने मध्यस्थी करुन भांडव मिटवण्याचा प्रयत्न केला असता तेथील तीन अनोळखी इसमांनी ‘तू मध्ये का बोलतोस?’ असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली. कांबळे हे त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करीत असताना तिघांपैकी एकाने त्यांच्या डोक्यात विट मारुन त्यांना जखमी केले व अन्य दोघांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करताना ते एकमेकांना बिरजा व मोन्या या नावाने आवाज देत असल्याने याबाबतची चौकशी केली असता त्यांची नावे बिरजू उर्फ बिरजा राजू वाघ (रा.कोठी) व मोन्या साळवे असल्याची समजले. अशी फिर्याद कांबळे यांनी पोलिसांत दिली.

यावरुन कोतवाली पोलिसांनी श्याम कांबळे याच्या फिर्यादीवरुन मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलीस हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा