महाबळेश्वर

महाबळेश्वर हे एक अनेक निसर्गरम्य स्थानांपैकी असे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. तेथील घाट चढतांना आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसर पाहून मन कसे हरवून जाते. वळण-वळणांचे रस्ते व नागमोडी रस्ते हे अतिशय विलोभनीय असून पुढील रस्ते तर दाट झाडांनी कसे अगदी हिरवेगार वाटतात. मधेच एखादी दरी दिसली कि डोळे कसे घट्ट बंद करावे असे वाटते. महाबळेश्वरची खासियत म्हणजे मुंबई ठिकाण तेथून सूर्यास्ताची एक आगळीवेगळी शोभा दिसते शिवाय  परतीच्या उतारावरची सुंदर हिरवळ जशी सूर्यसारखी कुणीतरी हिरवागार गालीचा पसरवला आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे.

मुंबई स्थानावरून दिसणारा (हा समुद्र जणू हिरवाच आहे ) असा आभास होतो. शिवाय तेथील आर्थर सीत, एल्फिन्स्टन पोइंट, लॉर्डविक पोइंट देखील भव्य दिव्य निसर्गाचे दर्शन देतात व ते निसर्गाचा जसा साक्षात्कारच करतात. एवढेच नव्हे तर हे ठिकाण गरिबांचे पोट भरण्याचे ठिकाणदेखील आहे तेथे बांधलेले अलिशान आहारगृह, विश्रामगृह हे सदैव गजबजलेले असतात.

समाजातील गरीब, श्रीमंत हि विषमता जरी दिसून आली तरी तेथील निसर्ग हा श्रीमंतांच्या बंगल्यावर आहे गरिबांच्या झोपडीवर देखील एकसारखेच वैभव उधळत असतो. असे मनाला प्रसन्न करणारे निसर्गरम्य महाबळेश्वर जणू हिरवा समुद्र आहे की काय!

मार्ग – महाबळेश्वर वाईपासून 32 किमी अंतरावर आहे. मुंबई राजधानीपासून सुमारे 260 किमी आहे. सातारापासून 45 किलोमीटर आणि पुणेपासून 120 किमी अंतरावर आहे. सातारा, पुणे, मिरज आणि सांगली येथुन बस आणि रेल्वे सेवा उपलब्ध आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा