लिंबूचे गुण गोड

सकाळ-संध्याकाळ एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून पिण्याने लठ्ठपणा कमी होतो.

लिंबाच्या फोडीत काळं मीठ भरून चोखण्याने मूळव्याधीत होणारा रक्तस्राव बंद होतो.

खोकला किंवा खूप सर्दी झाली असल्यास अर्ध्या लिंबाच्या रसात दोन चमचे मध मिसळून चाटावे.

लिंबाचे सेवन केल्याने हृदय गती सामान्य राहते.

एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून, त्यात काळं मीठ टाकून सकाळ संध्याकाळ दोनदा नियमित एक महिना पिण्याने मूतखडा विरघळून जातो.

लिंबाचे दोन भाग करावे. त्यांना तव्यावर शेकून त्यावर काळं मीठ भुरभुरून चाटण्याने पित्त विकार दूर होतो.

एका लिंबाच्या रसात तीन चमचे साखर, दोन चमचे पाणी मिसळून हे मिश्रण डोक्यावर लावण्याने कोंडा दूर होतो आणि केस गळणेही थांबते़.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा