कमरेचे किरकोळ दुखणे दुर्लक्षित करू नका

आजकाल अनेक लोक कमरेच्या दुखण्याने त्रस्त आहेत. अनेकांना समजतच नाही की, कमरेचे हे साधारण दुखणे कधी मोठा आजार होतो. किरकोळ, परंतु कमरेच्या सतत दुखण्याने कालांतराने एंकायलूजिंग स्पाँडिलायटिस हा आजार बळावला जातो. एंकायलूजिंग स्पाँडिलायटिस या आजारात पाठीचा कणा मोठा होतो. त्यामुळे रुग्णाला अधिक वेळ बसणे मोठे कठीण जाते. चालण्या-फिरण्यासही अशा रुग्णांना त्रास होतो.

भारतात १०० लोकांपैकी एक जण एंकायलूजिंग स्पाँडिलायटिसने त्रस्त आहे. अधिकतर २० ते ३० वर्षीय तरुणांना एंकायलूजिंग स्पाँडिलायटिसचा आजार होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात या आजाराचे १० लाख रुग्ण आहेत. एंकायलूजिंग स्पाँडिलायटिसवर औषधोपचार करूनही रुग्ण हाडाच्या दुखण्याने त्रस्त आहेत. हाडांतील दुखण्यामुळे, तसेच सूज आल्यामुळे पाठीचा कणा कठीण होतो.

चेन्नईच्या डॉ. एम. हेमा यांनी एंकायलूजिंग स्पाँडिलायटिसवर उपचार न घेतल्याने रुग्णांना दररोजची कामे करण्यातही अडथळा येत असल्याचे सांगितले. सततच्या दुखण्यामुळे शरीर संरचनेतही बदल होऊन नुकसान होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एंकायलूजिंग स्पाँडिलायटिस जुना आणि शरीरात कमजोरी आणणारा रोग आहे. अनेक कारणांनी रुग्णांना या आजारावर चांगले उपचार करण्यासाठी पर्याय उपलब्ध होत नाहीत, परंतु बायोलॉजिक थेरेपी करून शरीराच्या संरचनात्मक प्रक्रियेत नुकसान कमी करू शकते, तसेच रुग्णांच्या चालण्या-फिरण्याच्या स्थितीतही सुधारणा केली जाऊ शकते.

पाठीचा कणा किरकोळ दुखत असल्याने त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु याच साधारण दुखण्याचे रूपांतर कालांतराने एंकायलूजिंग स्पाँडिलाइटिस या आजारात होते. दुर्लक्ष केल्यामुळे आजार जुना होऊन त्यावर उपचार करणे कठीण जाते आणि रुग्णाला दैनंदिन कामेकरण्यातही समस्या येतात. त्यामुळे पाठीच्या कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपचार करणे फायद्याचे ठरते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा