डोकेदुखी होण्यामागची कारण

उन्हाळ्यात घामावाटे खनिजांचे होणारे उत्सर्जन, तहान भागविण्यासाठी आईस्क्रीम किंवा कृत्रिम शीतपेयांचा केलेला अतिरिक्त वापर, समतोल आहाराचा अभाव, अपुरी झोप, सतत दडपणाखाली असलेला मेंदू, मानसिक ताणतणाव, वेळी-अवेळी खाणे, तेलकट, मैद्याच्या पदार्थाचा आहारात असलेला समावेश या कुपथ्याने शरीरात विजातीय घटक साठतात याचा परिणाम म्हणजे डोकेदुखी होय.