आहारासाठी

देहाची सुंदरता व स्त्रीचे सु-आरोग्य या दोन्ही बाबी परस्पर निगडीत व परस्पर पुरक असतात. सुंदर देहात तेवढाच सुंदर आत्मा वा मन वास करत असणे आवश्यक ठरते, अन्यथा स्त्री-सौंदर्यास उठाव येत नसतो.

स्त्रीच्या सौंदर्याचे वर्धन करण्यासाठी तिने आपल्या दैनंदिन जीवनात संतुलीत आहार व नियमीत व्यायाम ही द्विसुत्री विसरू नये.