बॉडी बिल्डींगसाठी आवश्यक पदार्थ

तेलबिया म्हणजे पांढरे आणि काळे तीळ, शेंगदाणे, जवस, सूर्यफुलाच्या बिया. सुकामेव्यामध्ये बदाम, अक्रोड. सोयाबीन, पावटा, मसूर आदी पदार्थांपासून बॉडी बिल्डींग करणार्‍यांसाठी भरपूर प्रोटीन्स मिळते. थंडीत रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते ती टाळण्यासाठी म्हणून काही पदार्थ आहारात आवश्यक आहेत.

आलं, सुंठ, लसूण, तुळस, गवती चहा असे औषधी पदार्थ जरूर घ्यावेत. लवंग, मिरे, दालचिनी, मोहरी, हळद असे जंतुनाशक, प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ. ओवा, हिंग, मेथी दाणे यांमुळे, भूक वाढते, अन्नपचन सुधारते, रक्ताभिसरण वाढते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बाजरीची भाकरी तुप व तिळाची चटणीही पौष्टिक घटक आहे.