अॅसिडीटी टाळण्यासाठी

मानसिक ताण, काळजी यांमुळे अॅसिडीटी वाढते, त्याकरिता या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडिटेशन, रिलॅक्सेशन टेक्निक्स करावे. जागरण टाळावे.

किमान साडेसहा ते सात तास झोप घेणे आवश्यक असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एस्पिरीन, सांधेदुखीची औषधे, पेनकिलर्स परस्पर घेऊ नयेत. घाईगडबडीने जेवल्याने अपचन, अॅसिडीटी असे त्रास होतात.