मोहरी खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊ

मोहरी केवळ पदार्थाची चव वाढविण्यासाठीच उपयोगी नाही. तर तिचे अन्यही काही फायदे आहेत. त्यामुळे मोहरी खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊयात.

१. अपचन, पोटदुखी, अजीर्ण झाल्यास मोहरीचे चूर्ण आणि खडीसाखर एकत्र करुन पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे पोटाचे विकार किंवा अन्य समस्या दूर होतात.

२. तीव्र ताप, सर्दी, कफ झाल्यास मोहरीचे चूर्ण आणि मध एकत्र करुन ते चाटण घ्यावे.

३. पायात काटा किंवा काच गेल्यास त्या जागेवर मोहरीचं चूर्ण, तूप आणि मध एकत्र करुन त्याचा लेप लावावा.

४. संधिवातात हात-पाय दुखत असल्यास एरंडाच्या पानाला मोहरीचं तेल लावून ते पान गरम करुन दुखत असलेल्या भागावर बांधून ठेवावं.

५. दातदुखी, दात किडणे अशा समस्येवर गरम पाण्यात मोहरी उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे दातातील कीड मरते.तसंच हिरड्या मजबूत होतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा