शुद्ध गायीच्या तुपात एन्टीऑक्सिडेंट ,एन्टीबॅक्टेरियल आणि व्हिटॅमिन असतात

एका संशोधनानुसार, गायीचं तूप शरीरात असे काही घटक, तत्व तयार करतं, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

गायीच्या शुद्ध तुपामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. शुद्ध गायीच्या तुपात एन्टीऑक्सिडेंट ,एन्टीबॅक्टेरियल आणि व्हिटॅमिन  असतात, जे शरीराला संसर्गापासून Infections वाचवतात. हे सर्व तत्व शरीरातील टॉक्सिन पदार्थ अर्थात विषारी द्रव्य बाहेर काढतात.

– गायीच्या शुद्ध तुपाचे काही थेंब नाकात टाकल्याने ऍलर्जी कमी होण्यास मदत होते.
– तुपामुळे टाईप-2 डायबिटीसपासून दूर राहता येतं.
– शुद्ध गायीचं तूप लठ्ठपणा कमी होण्यास फायदेशीर ठरतं.
– गायीच्या तुपात व्हिटॅमिन ‘के’ Vitamin k असतं. त्याशिवाय मिनरलही असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करतात.
– वजन खूप असल्यास तूप खाण्यापासून लांब जाऊ नका, तर तुपाचा डाएटमध्ये समावेश करा. गायीचं शुद्ध तूप वजन न वाढवता ते नियंत्रणात ठेवतं.
– गायीच्या तूपाचे काही थेंब नाकात टाकल्याने केस गळणं कमी होऊ शकतं. त्याशिवाय नवीन केसही येण्यास मदत होते.
– हाता-पायाची जळजळ होत असल्यास गायीच्या तुपाने, पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास जळजळ कमी होण्यास मदत होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा