आपल्याला चांगलं आरोग्य राखायचं असेल तर त्यासाठी एक सोपा मंत्र ..

सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.शरीराची स्वत:ची एक सुरक्षा यंत्रणा असते जी इन्फेक्शन आणि खराब कोशिकांशी लढण्यात मदत करतात. सकाळी पाणी प्यायल्याने इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता वाढते. दिवसभरात सर्वांनी कमीत कमी पाचवेळा कोमट पाण्याचं सेवन करायला हवं. जपानी मेडिकल सोसायटीनुसार, रिकाम्या पोटी सकाळी पाणी प्यायल्याने तुम्हाला डोके दुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढतं वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवीच्या आजारांचा उपचार घेण्यास मदत मिळते.आपल्याला चांगलं आरोग्य राखायचं असेल तर त्यासाठी एक सोपा मंत्र आहे की, आपण दररोज सकाळी झोपून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावं. कोरोनाशिवाय कोमट पाणी प्यायचे इतरही फायदे आहेत. ज्याबाबत आपण जाणून घेऊ….

पोट साफ होते
कोमट पाणी पिण्यामुळे आतडे संकुचित होण्यास मदत होते. यामुळे आतड्यांमधे अडकलेला जुना कचरा आपल्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. अनेकदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. रोज कोमट पाणी पिण्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

भूख कमी लागण्याची समस्या होते दूर
भूख लागत नाही अशी तक्रार अनेकजन करत असतात. ही समस्या पोट साफ न झाल्यामुळे असू शकते. भूख लागत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळी मिर्ची पावडर टाकून प्यावे. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वजन कमी करण्यासाठी फायद्याचे
आपलं इंटर्नल टेम्प्रेचर कमी करण्यासाठी आणि मेटॅबॉलिझमला अॅक्टिव्हेट करण्याचं काम कोमट पाणी करतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं. वजन सतत वाढत असल्यास गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकून तीन महिन्यांपर्यंत पिण्याने फायदा होऊ शकतो. जर हे पाणी प्यायचे नसल्यास, जेवणानंतर एक ग्लास गरम पाणी पिणं फायद्याचं ठरेल.कोमट पाणी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे.

चेहऱ्यावर तेज येते
कोमट पाणी पिल्यानंतर चेहऱ्यावर तेज येतो. त्वचेवरील सुरकत्या नाहीशा होण्यासही मदत होते. शिवाय कोमट पाण्यामुळे केस लवकर केस पांढरे होणार नाहीत.

कोमट पाणी वाफ निर्माण करतं त्यामुळे पाणी प्यायल्यानंतर श्वास घेण्यात फायदा होतो. कफ असो, गळा खवखवणं की नाक ब्लॉक होणं कोमट पाणी पिणं या सर्वांवर फायदेशीर ठरतं.

सकाळी उठून पाणी प्यायल्याने नवीन कोशिकांची निर्मिती होते. यासोबतच मांसपेशींमध्ये मजबूती येते.

सकाळी उठून पाणी प्यायल्याने गळा, मासिक पाळी, डोळे, लघवी आणि किडनीसंबंधी समस्या दूर होतात.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा