स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

कर्करोग : स्त्रियांचा छुपा शत्रू 

स्त्रियांना होणारा कर्करोग खरोखरच एका छुप्या शत्रूप्रमाणे आजार वाढवतो; कारण कुठल्याही कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणे तीव्र स्वरुपात जाणवत नाहीत. अगदी हळूहळू शरीरात या व्याधीचा प्रसार होतो. त्यामुळे बरेचदा कर्करोग अंतिम अवस्थेत पोहोचतो त्या वेळेस त्याची लक्षणे दिसू लागतात. उपचाराला उशीर झाल्यामुळे रोगाचे समूळ उच्चाटन शक्य होत नाही.

या अवस्थेतील रुग्णांचे औषधे, केमोथेरपी व रेडिओथेरपीच्या साहाय्याने फक्त आयुष्यमान वाढवता येते. एखादा शत्रू जसा मागून अचानक हल्ला करतो, तसाच कर्करोग छुप्या शत्रूप्रमाणे शरीरावर अचानक हल्ला करतो. याकरिताच स्त्रियांनी चाळीशीच्या दरम्यान वर्षातून एकदा स्त्रीरोग तज्ज्ञांकडून संपूर्ण शरीराची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. कारण पहिल्या अवस्थेमध्ये कर्करोगाचे निदान झाले तर लहान शस्त्रक्रियेने रोगाचे समूळ उच्चाटन करता येते.

शारीरिक संबंध झाल्यानंतर अंगावरुन रक्तस्त्राव होतो हे लक्षण एका रुग्ण महिलेने मला सांगितले. सोनोग्राफी, पॅपस्मिअर या तपासण्यांमधून तिला गर्भाशयमुखाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोग प्राथमिक अवस्थेमध्ये असल्याचे लक्षात आल्याने लगेचच गर्भाशय निर्हरण शस्त्रक्रिया केली व या रोगापासून तिची पूर्णपणे सुटका केली. या घटनेला सात वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही तिला कुठलाही त्रास होत नाही.

 डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स.9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा