स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

लग्न करण्याआधी हे माहीत हवे

चाचण्यांच्या या निदानांची आणि त्याच्या शक्य परिणामांची कल्पना वधूवर दोघांनाही देऊन लग्न करण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्याचा सल्ला दिला. आपल्याकडे बरेचसे विवाह फसवून केले जातात. बर्‍याच वेळी वधू किंवा वर यांना लग्नाआधीच मधुमेह, हृदयरोग, एड्स हे आजार जडलेले असतात. ते लपवून ठेवले जातात. मात्र त्यामुळे आयुष्याला धोका पोहोचतो.

मधुमेहामुळे वारंवार गर्भपात किंवा शारीरिक संबंधांना त्रास, जंतुसंसर्ग, वंध्यत्व अशा आजारांचा सामना करावा लागतो. विवाहापूर्वी ब्युटीपार्लर, लग्नपत्रिका छापणे, बस्ता बांधणे या सर्व कामांच्या आधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचाही समावेश करावा.

 डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12