स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

लग्न करण्याआधी हे माहीत हवे

एका थेलेसेमिया कॅरअर व्यक्तीने दुसर्‍या नॉर्मल व्यक्तीशी लग्न करावे. यामधून जन्माला येणारी 50% अपत्य नॉर्मल हिमोग्लोबीन तयार होणारे असतात; तर 50% अपत्य थेलेसेमिया कॅरिअर असतात, जी संपूर्णपणे निरोगी जीवन जगू शकतात. यामध्ये थॅलेसेमिया मेजरग्रस्त बालकांचा जन्म होऊ शकत नाही हा आजार आपोआप रोखला जातो. सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी थेलेसेमियाबद्दल एवढे विस्तृत सांगितले. कारण थॅलेसेमिया मेजर बालक जन्माला आले तर संपूर्ण कुटुंबाला वारंवार शारीरिक, मानसिक व आर्थिक आघात सहन करावा लागतो. विवाहपूर्व आणि गर्भावस्थेत थेलेसेमिया तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे.

एखाद्या गर्भवती स्त्रीचे हिमोग्लोबीन ’इलेक्ट्रो फोरेसिस’ केले आणि तो रिपोर्ट प्राकृत आला तर थेलेसेमिया मेजर अपत्य होण्याची शक्यता नसते. परंतु जर गर्भवती महिला थेलेसेमिया कॅरिअर असेल तर पित्याचेही रक्त तपासणे महत्त्वाचे आहे. पितादेखील थेलेसेमिया कॅरिअर असेल तर गर्भस्थ बालकाच्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. आज वैद्यकीय शास्त्रात अनेक उपाययोजना आल्या आहेत. छातीची एक्स-रे तपासणीही करून घ्यावी. यामुळे वधू किंवा वर यांपैकी एकाला क्षयरोगाची लागण असेल, तर त्याचे निदान होते.

क्षयरोगाची लागण झालेली असेल, तर स्त्रीमध्ये गर्भाशयाला व बीजवाहक नलिकेला त्याची लागण होऊन वंध्यत्व निर्माण करणार्‍या पेशींवर परिणाम होतो. त्यामुळे शुक्रजंतूची संख्या कमी होऊ शकते किंवा शुक्रजंतूचा पूर्णपणे नाश होऊ शकतो. याकरिता वेळीच निदान करून औषधोपचार करता येतात. खरे तर टीबी, त्वचारोग, डोळ्यांचा नंबर, दमा, मधुमेह, हृदयरोग अशा आजारांची कल्पना जोडीदाराला आधीच द्यायला हवी. त्यामुळे संसारामध्ये येणारे वैफल्य टाळता येते. एकदा विवाह झाल्यानंतर एखाद्या शारीरिक किंवा मानसिक आजाराचे निदान झाले, तर एकमेकांवर दोषारोप केले जातात व फसवणूक झाल्याची भावना मनात येऊन वैवाहिक अस्वास्थ्य निर्माण होते.

विवाहपूर्व मार्गदर्शनामध्ये एकदा वधू-वर तपासणीसाठी आले होते. साखरपुडा झालेला होता. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. वधूचे रिपोर्ट नॉर्मल होते. परंतु वराच्या एक्स-रे तपासणीम ध्ये टीबीची लागण झालेली दिसली. त्यामुळे फुफ्फुसाचा एक भाग निकामी झाला होता. तो बर्‍याच दिवसांपासून धूम्रपान करत होता. ही गोष्ट त्याने वधूपासून लपवून ठेवली. वीर्य तपासणी केली असता शुक्रजंतूंचे प्रमाण कमी असल्याचे समजले.

 डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12