स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

उपचार – शारीरिक कारणे : कष्टार्तवामध्ये प्रथमत: व्याधीची लक्षणे कशामुळे जाणवतात यासाठी काही तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. यासाठी रक्त व लघवी तपासणी तसेच सोनोग्राफी करून घ्यावी. सोनोग्राफीमध्ये कुठल्या शारीरिक दोषामुळे कष्टार्तव होत आहे याचे निदान होते. जर हार्मोन्समध्ये असंतुलन असेल तर सुरुवातीला तीन महिने हार्मोनल थेरपी करावी. इस्ट्रोजन + प्रोजेस्टेरोन गोळ्या घेतल्यामुळे बीजनिर्मिती थांबते. त्यामुळे पाळीच्या वेळेस वेदना होत नाहीत. त्यासोबतच अशोकारिष्ट सुरू करावे.

जर गर्भाशयाचे मुख अरुंद असेल तर डायलेटेशन करून ते रुंद करून घ्यावे. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी रजःस्राव व्यवस्थित होऊन वेदना होत नाहीत. आंतर जननेंद्रियांना जंतुसंसर्ग झाल्यामुळे वेदना होत असतील तर जंतूनाशकचे (ntibiotics) उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत. कष्टार्तव या व्याधीच्या उपचाराचा विचार करताना शारीरिक उपचारांबरोबरच मानसिक उपचारांनादेखील महत्त्व आहे. त्यामुळे तरुण मुलींना त्यांच्या आईने पाळीबद्दल व्यवस्थित समजावून सांगावे.

हा एखादा रोग नाही; तर मासिक पाळी सुरू होणे ही आपल्या आयुष्यातील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण स्त्रीचे स्त्रीत्व यावरच अवलंबून असते. पाळीमध्ये ओटीपोटात थोड्याफार वेदना होतात. त्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे. ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. त्याकरिता ’तू तुझा दैनंदिन अभ्यास, इतर कार्य चालू ठेव. फक्त जास्त मैदानी खेळ खेळू नकोस’ अशी माहिती आईने व शिक्षिकेने मुलींना सांगावी. शाळेत या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान ठेवावे.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12