स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

काकू गोर्‍यापान, उंच, सरळनाकी व बुद्धिमान होत्या. म्हणजेच त्या पित्तप्रकृतीच्या होत्या. त्यांच्या आहारात लोणचे, पापड, दही, अति तिखट, मसालेदार भाज्या यांचा समावेश होता. लोणचे व पापडाशिवाय त्यांना जेवणच जात नसे. शाळेत व घरी दिवसभरात आठ-नऊ कप चहा होत असे. अति कष्टाळू, घरातील सर्व कामे करून त्या शाळेत जात. त्यांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय आणि कडक होता. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा म्हणून त्यांची चिडचिड होत असे.

हे सर्व ऐकल्यानंतर मी त्यांना आहारविहारात बदल करण्यास सांगितले; कारण त्यांच्या चुकीच्या आहारविहाराने पित्तप्रकोप होऊन अति रक्तस्राव होत होता. त्याही मला म्हणाल्या, ‘मॅडम, मी तुम्ही सांगाल ती पथ्ये पाळेन. परंतु मला शस्त्रक्रिया करायची नाही.’ मी त्यांना कमी तिखट, मधुर व शीत कषाय गुणात्मक आहार घेण्यास सांगितला. आहारात नाचणी, काळे खजूर, मनुके, ओले खोबरे या पदार्थांचा समावेश करण्यास सांगितले. अति कष्टाची कामे करू नका, हा सल्ला दिला. मन:शांती व हार्मोन्स संतुलनासाठी प्राणायाम, ओंकार, ध्यानधारणा करण्यास सांगितले.

औषधी चिकित्सेमध्ये पित्तघ्न, रक्तस्तंभक व अपानवायू दुष्टी कमी व्हावीत म्हणून दशमूलारिष्ट, चंद्रप्रभा वटी, कांचनार गुग्गुळ अशी औषधे दिली. पंचकर्मामध्ये कटी व उदरभागी वातशामक तेलाने स्नेहन करून नाडी स्वेदन केले. त्यानंतर लेखन बस्ती व सहचरादि तैलाची योग बस्ती करून पुढील तीन महिने प्रत्येक पाळीच्या सहा, सात, व आठव्या दिवशी गर्भाशयात कासीस् आणि क्षार तैलाची निर्जंतुक उत्तर बस्ती दिली.

हे सर्व उपचार केल्यानंतर सहा महिन्यांनी आम्ही सोनोग्राफी केली असता फायब्रॉईडचा आकार हा 18 मिमी 12 मिमी एवढा कमी झाला होता. त्यांचा रक्तस्रावदेखील कमी झाला होता. फायब्रॉईडचा आकार बराच कमी झाल्यामुळे त्यांचा त्रास पुष्कळ कमी झाला होता. मी त्यांना सांगितले, ‘काकू, आता तुमची एक ते दोन वर्षांत पाळी जाईल. पाळी गेल्यानंतर फायब्रॉईडचा आकार अजूनच कमी होईल. त्यामुळे आपण लगेचच शस्त्रक्रिया करायला नको. फक्त वर्षातून एकदा सोनोग्राफी करत राहू. जर फायब्रॉईडचा आकार परत वाढला तरच शस्त्रक्रिया करू.

हे सर्व ऐकल्यानंतर ‘‘थंक्यू मॅडम, तुमच्यामुळे माझी शस्त्रक्रिया टळली.‘‘ असे त्या आनंदाने म्हणाल्या. अशा प्रकारे अगदी किचकट त्रासदायक रुग्णदेखील चिकित्सेने बरे होतात. फक्त डॉक्टरांवर विश्वास ठेवून, त्यांनी सुचवलेले औषधोपचार नियमित घेण्याची, आहारविहारातील बदल करण्याची, धीर व संयमाची गरज असते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12