स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

दोन चमचे आवळा रस आणि दोन चमचे दुर्वारस घ्यायला सांगितला. अति रक्तस्राव होणे हे अपानवायूची दुष्टी झाल्याचे लक्षण होते. ती कमी होण्यासाठी चंदनबलालाक्षादी तैलाची मात्रा बस्ती तिला सुरू केली. आठ दिवसांतच रीयामध्ये चांगला फरक दिसला. रक्तस्राव थांबल्यामुळे ती आनंदी व उत्साही दिसत होती.

अशाप्रकारे चंदनबलालाक्षादी तेलाची मात्रा बस्ती, पथ्यकर आहारविहार, प्रवाळभस्म, कामदुधा वटी, लोध्रासव, महामंजिष्ठादी काढा या रक्तस्तंभक, रक्तशुद्धीकर व पित्तघ्न असा औषधोपचार करून रीया पूर्णपणे बरी झाली. आयुर्वेदामध्ये औषधोपचाराबरोबरच पथ्याला किती महत्त्व आहे हे वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. जेथे हार्मोनल थेरपी देऊनही फरक पडत नाही, तिथे आयुर्वेदिक औषधोपचारांनी व पंचकर्म चिकित्सेने उपशय मिळतो, असा अनुभव आहे.

रुग्णानुभव – 4 अत्यार्तव व फायब्रॉईड (Uterine Fibroid) : जोशी काकू प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्यांना अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. त्रास झाल्यावर इंजेक्शन व औषधे घेऊन तेवढ्यापुरता आराम वाटत असे. मी नेहमी त्यांना म्हणायचे, अहो काकू, तुम्ही एकदा तरी सोनोग्राफी करून घ्या. तुम्ही पंचेचाळिशी गाठली आहे. वयानुसार एकदा तरी रक्त, लघवी व सोनोग्राफी करायला हवी.

सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या गर्भाशयामध्ये गाठी (फायब्रॉईड) आहेत हे लक्षात आले. गर्भाशयाच्या पुढील बाजूच्या त्वचेमध्ये (Intramural) गाठ झाली होती. त्या फायब्रॉईडचा आकार हा 48 मिमी 25 मिमी एवढा होता. काकूचे वय व त्यांना होणार्‍या त्रासाचा विचार करून त्यांना गर्भाशय निर्हरण शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.

परंतु मी त्यांना म्हणाले, ‘काकू, तुमचा जर आयुर्वेदावर विश्वास असेल, तर आपण ही शस्त्रक्रिया करण्याआधी काही आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म क करूया.’ जोशीकाकू ऑपरेशनला खूप घाबरत होत्या. ऑपरेशनशिवाय मला फरक पडू शकतो या कल्पनेनेच त्या आनंदी झाल्या व उपचार करण्यास तयार झाल्या.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12