हरिहरेश्‍वर ग्राम विकास प्रतिष्ठानतर्फे 19 मे रोजी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

अहमदनगर- एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, पुणे व केडगाव येथील हरीहरेश्‍वर ग्रामविकास प्रतिष्ठाण व जिव्हाळा जेष्ठ नागरिक, अपंग, अनाथ, निराधार, मंचाच्यावतीने रविवार 19 मे रोजी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन स्वामी विवेकानंद चौक, भुषणनगर, केडगाव देवी, नगर येथे केले आहे.

या शिबीरामध्ये एच. व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे येथील तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून डोळ्यांच्या समस्यांवर योग्य मार्गदर्शन व औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच चष्म्याचा अचूक नंबर काढून दिला जाईल व रुग्णांची रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली जाणार आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केलेल्या रुग्णांना शिबीराच्या ठिकाणापासून, मोफत प्रवास, राहण्याची, जेवण्याची तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काळा गॉगल मोफत, तसेच बिनटाक्याची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून चांगल्या प्रतीचे लेन्स वापरले जाणार आहेत. तरी परिसरातील गरजू नागरिकांनी व नेत्ररुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा.

नाव नोंदणीसाठी मोबा.नं. 9325108057, 8421286709 या नंबरवर संपर्क साधावा असे आव्हान प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चेमटे यांनी केले आहे.