गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या वर्षानिमित्त 3 नोव्हेंबरला कीर्तन व मिरवणुकीचे आयोजन

अहमदनगर- गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या वर्षानिमित्त अहमदनगर शहरात गुरुद्वारा भाई दयासिंगजी तसेच सीख, पंजाबी, सिंधी समाजाच्यावतीने 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता नगर कीर्तन- मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मिरवणूक गुरुद्वारा भाई दयासिंगजी येथून निघून, गुरुद्वारा भाई कुंदन लालजी तारकपूर येथून लालटाकी, सर्जेपुरा, तेलीखुंट, गुरुनानक मार्केट, नवीपेठ, आशा टाकीज चौक, माणिक चौक, कापड बाजार, आडते बाजार, रामचंद्रखुंट, कोटला, एसी डेपो गुरुद्वारा, डीएसपी चौक, गोविंदपुरा या मार्गाने जाणार आहे. मिरवणुकीनंतर गुरुद्वारामध्ये किर्तन आणि भंडार्‍याचे आयोजन करण्यात आलेले आहे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गुरु दयालसिंग वाही, हरजित सिंग वधवा, रवींद्र नारंग, राजेंद्र चावला, लकी वाही आदींनी केले आहे.