कुंदरलाल गुरुद्वारा येथील परिसराचा चेहरा मोहरा बदलणार – आ. संग्राम जगताप

अहमदनगर- कामासाठी भविष्यात भरीव मदत उभी करुन देऊन सदरच्या परिसराचा चेहरा मोहरा बदलुन टाकणासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्‍वासन आ.संग्राम जगताप यांनी दिले.

आ. संग्राम जगताप हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी येथील कुंदरलाल गुरुद्वारा या ठिकाणी भेट दिली. यावेळी मंदीर समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

जगताप म्हणाले की, कुंदलाल गुरुद्वारा या ठिकाणी भाविकांनी जे प्रेम दिले त्याबाद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहिल.

यावेळी कुंदनलाल गुरुद्वारा लाडा भाटिया, ठाकूर सेट नवलानी, जनक अहुजा, प्रदीप पंजाबी, अनिश अहुजा, संजय अहुजा, करण अहुजा, मिथुन दुपार, चिंटू गंभीर, आकाश मनोचा, मनीष पुराना, दीपक किर्तने, भाऊसाहेब तांदळे, अमोल गाडे पाटील, बबलू खोसला आदींसह सिंधी पंजाबी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

समाज बांधवांच्या विकासाच्या अपेक्षा संग्राम जगताप हे पुर्ण करतील, असा विश्‍वास यावेळी अनेकांनी बोलून दाखवला आहे. त्यांच्या कामाची पध्दत पाहता त्यांना पाठबळ राहिल, असेही समाज बांधवांनी यावेळी आश्‍वासन दिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा