पनीरचे गुलाबजाम

साहित्य – शंभर ग्रॅम पनीर (दोन कप दुधात अर्धा लिंबू पिळून शंभर ग्रॅम पनीर होतं) दोनशे ग्रॅम खवा, एक वाटी मैदा, अर्धा चमचा खायचा सोडा, दोन चमचे बारीक रवा, चमचाभर तूप, पाच चमचे (पाव वाटीपेक्षाही थोडी जास्त) पिठीसाखर, तळायला रिफाईंड तेल.

पाकासाठी – तीन वाट्या साखर, दीड वाटी पाणी, अर्धा चमचा वेलदोडा पूड.

कृति – पनीर व खवा किसून घ्यावा. त्यातच तूप, सोडा, पिठीसाखर, मैदा हे सर्व घालावं. खूप मळून मऊ करावं. मग लहानलहान गोळे करून मंद आचेवर तळावे.

पाक – साखरेत पाणी घालून उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर गॅस बारीक करून पाच मिनिटं पाक उकळू द्यावा व मग त्यात वेलदोडा पूड घालून त्यात गुलाबजाम सोडावे व मुरू द्यावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा