गोव्यात नौदलाचं लढाऊ विमान कोसळलं

गोवा – भारतीय नौदलाचं ’मिग 29 के’ हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं हे विमान निर्मनुष्य भागात कोसळल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानातील दोन्ही पायलटनी प्रसंगावधान राखून पॅराशूटच्या मदतीनं वेळीच उड्या मारल्यानं ते थोडक्यात बचावले.

दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.