‘गुगल पे’ ने व्यवहार करताय?

गुगलने गुगल पे हे पेमेंट अॅप वापरणार्‍या भारतीय युजर्ससाठी खास फिचर आणले आहे. गुगल पे अपडेट केल्यानंतर आता कोणत्याही व्यवहारानंतर युजर्सला नॉटिफिकेशनबरोबरच मेसेज देखील येणार आहे. गुगल पेचे हे फिचर सुरू झाले आहे. आपल्या या नवीन अपडेटची माहिती कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे दिली.

गुगल पेचे प्रोडक्ट मॅनेजर अंबरीश केंगे यांनी गुगल पेच्या ब्लॉग पोस्टवर लिहिले की, आम्हाला याविषयी माहिती आहे की, युजर्स गुगल पे वर विश्वास दाखवून त्यांचे पैसे आमच्याकडे देत आहेत. याच विश्वासामुळे आम्ही आमच्या जबाबदारी प्रती जागृक आहोत. त्यांनी लिहिले की, सुरक्षात्मक सुविधांना लक्षात घेऊन या दिशेने मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. हे नवीन फिचर त्याचाच एक टप्पा आहे. गुगल पे भारतात 2017 मध्ये तेज नावाने लॉच केले होते. मात्र नंतर कंपनीने याचे नाव बदलले. गुगल पे युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयवर काम करते. भारतात सध्या गुगल पेचे लाखो युजर्स आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा