सुविचार

मुख्यमेकं पुरस्कृत्य शून्यात्मानोऽपि साधका: ।

भवन्ति, तं विना नैव, यथा संख्यांकबिन्दवा: ॥

मुख्य एकाला पुढे केल्यावर, त्याच्या मागून जाणारे शून्य किंमतीचे असले तरी काम साधून नेतात, पण! तो मुख्य नसेल तर मात्र व्यवहारात त्यांची किंमत शून्यच असते. जशी कोणत्याही संख्येच्या आकड्यावरची शून्ये त्या आकड्याचे मोल त्याच्या एवढेच असते, पुढच्या शून्यामुळे त्याला दसपट, शतपट, सहस्त्रपट किंमत येते, पण तो आकडा आधी असल्याशिवाय शून्यांनाही किंमत नसते, त्याची किंमत शून्यच.

सुविचार : आपल्या मुलांवर लहानपणीच केलेले संस्कार त्यांचे भविष्य घडविण्यास उपयोगी ठरतात.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर