सुविचार

यद्यत्परवशं कर्मं तत्रधत्नेन वर्जयेत् ।

यद्यदात्मवशं कार्यं तत्रधत्नेन योजयेत् ॥

अर्थ – पराधीन जे जे म्हणून कर्म असेल ते ते प्रयत्नपूर्वक वर्ज्यच केले पाहिजे आणि स्वाधीन जे जे कर्म असेल ते ते प्रयत्नपूर्वक योजिले पाहिजे कारण ‘सर्वं परवशं दु:ख:, सर्व आत्मवशं सुखम्’ म्हणजे ‘पराधीन’ ते सर्व दु:ख व स्वाधीन ते सर्व सुख अशी सुख-दु:खाची व्याख्या आहे.

सुविचार – स्वावलंबी जीवन हेच खरे सन्माननीय जीवन होय आणि परावलंबी जीवन साक्षात सजीव मरण होय.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा