सोन्यातही एसआयपी!

दिर्घकाळासाठी गुंतवणूक फायदेशीर

इक्विटी किंवा म्युच्युअल ङ्गंडप्रमाणेच गोल्ड एसआयपीमध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक फायदेशीर आहे. गोल्ड एसआयपी ही ठराविक काळात नियमित होणारी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीनुसार परतावा मिळतो. गोल्ड एसआयपी हा रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचा लाभही देते. कमी किंमतीतही नियमित होणारी गुंतवणूक ही कालांतराने लाभदायी ठरते.

चक्रवाढ व्याजाचा लाभ

गोल्ड एसआयपीवर मिळणारा परतावा हा चक्रवाढ स्वरुपात मिळतो. त्यामुळे गुंतवणुक लवकरात लवकर सुरू करणे हे हिताचे ठरते. अर्थात गुंतवणूकीसाठी मोठी रक्कम असणे गरजेचे नाही. तसेच अशा प्रकारच्या गुंतवणूकीत धावपळ करण्याची गरज नाही. एसआयपीची रक्कम बँक खात्यातून आपोआप कपात होत राहिल आणि आपण गोल्ड एसआयपीवर सोयीनुसार कधीही बहुतांश म्युच्युअल फंडनी एसआयपीच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूकीचा पर्याय ठेवला आहे.

यात किमान 500 ते कमाल कितीतरी रुपयात गुंतवणूक सुरू करता येणे शक्य आहे. सध्या एका तोळ्याचा (दहा ग्रॅम) भाव 34300 रुपये आहे. हा भाव गेल्या सहा महिन्यातील उच्चांकी पातळीवर आहे. आगामी वर्षात सोने 35 ते 36 हजार प्रति तोळा पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच एसआयपीच्या मदतीने सोन्यात गुंतवणूक सुरू केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे. लक्ष ठेऊ शकतो.

गोल्ड इटीएङ्गपेक्षा चांगली गुंतवणूक

गोल्ड इटीएफच्या तुलनेत गोल्ड एसआयपीमध्ये गुंतवणूक सोयीची आहे. कारण गोल्ड इटीएफमध्ये अधिक रक्कम लागते तसेच डीमॅट खात्याची आवश्यकता असते. गोल्ड एसआयपीतून केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच गुंतवणूक सुरू करता येते. सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे गोल्ड फंड आहेत. त्यात आपण एसआयपीच्या मदतीने गुंतवणूक करू शकतो. गोल्ड इटीएफमध्ये एसआयपी होऊ शकत नाही. यात किमान एक ग्राम सोने खरेदी करावे लागते. आज त्याचा भाव 3430 रुपये आहे. तर एसआयपीत पाचशे रुपये देखील पुरेसे आहेत.

गोल्ड सेव्हिंग स्किम

गोल्ड किंवा ज्वेलरी सेव्हिंग स्किम आपल्याला दर महिन्याला निश्‍चित कालावधीसाठी एक ठराविक रक्कम जमा करण्याची परवानगी देते. कालावधी संपल्यानंतर आपण एकूण गुंतवणुकीच्या समान सोन्याची खरेदी करू शकता.

सॉव्हेरिन गोल्ड बॉंड

केंद्र सरकारची सॉव्हेरिन गोल्ड बॉंडची योजना नागरिकांसाठी ङ्गायदेशीर आहे. अशाप्रकारचे बॉंड खरेदीसाठी सरकार काही काळ संधी देते. ही संधी दोन तीन महिन्यातून मिळते. या योजनेत सोन्याच्या वाढीबरोबर अडीच टक्के व्याजही मिळते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा