ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीतर्फे स्वहस्ते कीटकनाशक पावडर फवारणी

अहमदनगर- महानगरपालिकेमध्ये वारंवार अर्ज देऊन देखील मरियम मस्जिद व सहारा सिटी या भागात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न मिळाल्याने 12 ऑगस्ट रोजी बकरी ईद या सणाच्या दिवशी ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीतर्फे मुकुंदनगर भागातील सहारा सिटी, मरियम मस्जिद मागील या बहुलोक संख्याक भागात स्वहस्ते कीटकनाशक पावडर फवारणी करण्यात आली.

यावेळी कीटकनाशक फवारणी करताना संस्थेचे जिल्हा अध्यक्ष फहीम इनामदार व शहर अध्यक्ष फारुख शेख, जावेद शिकलकर, रफिक शेख, सामाजिक कार्यकर्ते तौसिफ खान आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

सदर भागात पाण्याचे डबके साचलेले नजरेस आले असून डेंगू व गोचीड ताप अशा जीवघेण्या आजाराचे रुग्णही आढळून आलेत. तरी महानगरपालिका अधिकार्‍यांनी सदर भागात जाऊन तपासणी करावी.

मुकुंद नगर भागातील रहिवाश्याणी ग्लोबल मानव पंलीक सेवा समितीचे आभार व्यक्त केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा