दत्तोपासनेचे प्राचीन स्थान गिरनार

सौराष्ट्रातील जुनागढ जवळचे हे स्थान दत्तोपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमातून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे.

हे दत्तमंदिर जुनागढ जवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृति प्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशाठिकाणी समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

गिरनारवर जैन मंदिर, एका पीराचा दर्गा, गोरखनाथ मंदिर, शिवमंदिर, दोन देवींची मंदिरे व दत्तमंदिर अशी मंदिरे आहेत. हा पर्वत बराच उंच असून, त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पाय-या आहेत.

दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारे दहा हजार पाय-यांची चढउतार करावी लागते. दत्तोपासनेच्या इतिहासात गिरनारचा महिमा विशेष आहे. त्या तपोभूमीत दत्त दर्शनाचा घ्यास आचरणारे अनेक ज्ञाताज्ञात महात्मे होऊन गेले. निरंजन रघुनाथ, किनाराम अघोरील नारायण महाराज जालवणकर इत्यादी दत्तोपासकांना गिरनारवरच दत्त साक्षात्कार झाला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा