भेट दडवताय सावधान!

करआकारणीत नातेवाईची संकल्पना : प्राप्तीकर कायद्यानुसार जर पती आपल्या पत्नीला किंवा पत्नी आपल्या पत्नीला भेटवस्तू देत असेल तर त्यावर कोणताही कर आकारला जात नाही. याप्रमाणे भाऊ-बहिण, आई वडिल, सासू, सासरे, जवळचे नातेवाईक किंवा पूर्वजाकडून मिळालेली भेट हे संपूर्णपणे करमुक्त आहे. एका पिता आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारचे मूल्य किंवा मालमत्ता भेटवस्तू स्वरुपात देऊ शकतो. पित्याकडून मुलाला देण्यात येणार्‍या भेटवस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही.

माहिती दडवल्यास दंड : जर आपल्याला रोख रुपात किंवा अन्य चल किंवा अचल मालमत्तेच्या रुपात बिगर नातेवाईक किंवा मित्राकडून 50 हजारापेक्षा अधिक मूल्यांची भेटवस्तू मिळाली असेल तर त्याची माहिती प्राप्तीकर विवरणात देणे गरजेचे आहे. जर आपण माहिती लपवल्यास आणि तपासात ही बाब समोर आल्यास प्राप्तीकर अधिकारी हे भेट वस्तूंच्या किंमतीच्या 200 टक्क्यांपर्यंत दंड आकारू शकतात. यासाठी बिगर नातेवाईकाकडून एका आर्थिक वर्षात 50 हजारापेक्षा अधिक मूल्य चल, अचल मालमत्ता किंवा रोख रुक्कम मिळाली असेल तर त्याची माहिती प्राप्तीकर विवरणात द्यावी आणि कायद्याप्रमाणे कर भरावा.

विवाहाचे गिफ्ट करपात्र नाही : विवाहादरम्यान नवरदेव किंवा नववधूला मिळणारे भेटवस्तू ही करपात्र नाहीत. कोणत्याही नातेवाईकाने दिलेले भेटवस्तू असतील तरीही त्यावर कर बसत नाही. मात्र भेटवस्तू देण्याची तारीख ही लग्नाच्या दिवशीची किंवा एक-दोन दिवस मागेपुढे चालू शकते. लग्नाच्या नावावर कधीही भेटवस्तू स्वीकारता येणार नाही आणि सवलत घेता येणार नाही. अशा प्रकारच्या भेटवस्तूत मूल्याची मर्यादा नाही. जर एखाद्याला शंका वाटत असेल तर तज्ञांशी सल्ला घेणे आवश्यक.

गिफ्ट डीड म्हणजे काय : गिफ्ट डीड हे एका प्रकारचे कागदपत्र असून त्याचा वापर हा रोख रक्कम किंवा वस्तूच्या रुपातून भेट वस्तू देताना केला जातो. त्याचवेळी भेटवस्तू ही कोणत्याही चल-अचल रुपातील आणि आपल्या इच्छेनुसार आणि स्वतंत्ररुपाने केला जाणारी हस्तांतर प्रक्रिया आहे. गिफ्ट डीडच्या माध्यमातून भेटवस्तू प्राप्त करणारा व्यक्ती हा भेटवस्तू देणार्‍या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत देत नाही.

अशा प्रकारचे बचत : तज्ञानुसार रोख रक्कम, धनादेश, मालमत्ता, दागिने आदी भेटवस्तूंच्या रुपातून मिळत असेल तर ते करपात्र आहे. गिफ्ट डीडच्या मदतीने आपण महागडे भेटवस्तू जसे की दागिने, मालमत्ता किंवा रोख रक्कम आपल्या नातेवाईकांना देऊन कर बचत करू शकतो. वडिलाने खरेदी केलेल्या फ्लॅटचे हस्तांतर हे आपल्या नावाने केल्यास त्याचाही फायदा घेता येतो. अर्थात त्यानंतर मिळणार्‍या उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागतो.

या प्रकारच्या भेटवस्तूंवर कर

जर एखाद्या व्यक्तीला किंवा संयुक्त हिंदु कुटुंबाला एका आर्थिक वर्षात रोख, धनादेश किंवा ड्राफ्टच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बिगर नातेवाईकाकडून भेट वस्तूच्या रुपातून प्राप्त होत असेल तर त्यावर संपूर्णपणे प्राप्तीकर भरावा लागेल. त्याचवेळी जमीन किंवा घर हे भेटवस्तू म्हणून मिळत असेल तर त्या मालमत्तेवर आकारण्यात येणार्‍या मुद्रांक शुल्काच्या हिशोबाने कर भरावा लागेल. याप्रमाणेच दागिने, पेटिंग, ड्राइंग, शेअर, सोने, चांदी आदी वस्तू भेट म्हणून मिळाल्यास त्यावर कर बसतो. भेटवस्तूची किंमत 50 हजारापेक्षा अधिक असल्यास कर आकारला जातो.

यात कर नाही

रक्तातील नाते किंवा जवळच्या नातेवाईकाकडून भेट वस्तू मिळाल्यास कर आकारला जात नाही. जर एखाद्या व्यक्तीला सख्खा भाऊ, बहिण, वडिलांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळत असेल जसे की जमीन, घर, दागिने असतील तर त्यावर कोणताच कर आकारला जात नाही. जर आपण एखादा सामाजिक उपक्रम राबविला असेल आणि त्याची दखल घेत स्थानिक प्रशासनाने आपल्याला भेट वस्तू दिली तर ती देखील करमुक्त असेल. याशिवाय एखाद्या शिक्षण संस्था किंवा चॅरिटेबल संस्थेकडून मिळालेली भेटवस्तू देखील कलम 10 (23) नुसार करमुक्त असते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा