पाठदुखीवर काय उपचार घ्यावे?

पाठदुखीला अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञाची रोजीरोटी असे गंमतीने म्हटले जाते! याचा अर्थ एवढाच की पाठदुखीवर उपचार घेत राहावे लागतात. शाहरूख खान, सचिन तेंडुलकर यांच्या पाठदुखीमुळे सर्वांना पाठदुखीविषयी जास्त माहिती झाली. पाठीच्या कण्याला दुखापतींमुळे वा आजारांमुळे पाठ दुखते. पाठीचे स्नायू दुखावले तरीही पाठ दुखते.

विचित्र अवस्थांमध्ये अवघडलेल्या स्थितीत काम करणे, मणक्यांच्या हालचालींचा अभाव, मणक्यांच्या पृष्ठभागावर खडबडीतपणा येणे, दोन मणक्यांमधील कुर्चा सरकून मज्जारज्जूवर दाब येणे, तसेच मणक्यांमध्ये अतिरिक्त हाडाची वाढ होणे या सर्वांमुळे पाठ दुखू शकते. काही वेळा नसा दाबल्या गेल्याने मुंग्या येणे, बधीरपणा येणे अशी लक्षणेही दिसून येतात. पाठदुखी झाल्यास वेदनाशामके घेणे हा वरवर सोपा पण तात्पुरता परिणाम करणारा उपाय होय.

पाठदुखी टाळण्यासाठी उभे राहताना, बसताना, काम करताना शरीराची अवस्था सुयोग्य राहील हे पाहायला हवे. सामान्यतः दिवसभरात अनेकवेळा आपण समोर झुकतो किंवा वाकतो. त्यामुळे पाठ दुखायला लागते. अशावेळी पाठीच्या कण्याला विरुद्ध दिशेने ताण देणारी भुजंगासन, नौकासन अशी आसने नक्कीच फायदेशीर ठरतात. पाठीच्या कण्यासाठीचे अनेक व्यायाम आहेत. पाठ दुखत असताना हे व्यायाम करू नयेत. पाठीचे व्यायाम हा पाठदुखी टाळण्याचा प्रभावी व कायमस्वरूपी इलाज आहे. मणक्यात रचनात्मक बिघाड झाला असेल तर क्वचित पाठदुखी बरी करण्यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा